Ad will apear here
Next
आनंद अंतरकर
आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’सारख्या मासिकाच्या संपादनाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखन करणाऱ्या आनंद अंतरकर यांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
..... 
१८ नोव्हेंबर १९४१ रोजी जन्मलेले आनंद अंतरकर हे उत्तम लेखक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत.

अनंत अंतरकर यांचे पुत्र असल्याने हंस, मोहिनी, नवल यांसारखी मासिकं हक्काची, घरातलीच असल्याने त्यांना साहित्याची लहानपणापासूनच गोडी होती. तशात वडिलांना भेटायला येणाऱ्या साहित्यिकांमुळे त्यांच्या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळत गेलं. भाषेचे, व्याकरणाचे उत्तम संस्कार त्यांच्यावर झाले.

त्यांनी लिहिलेली घूमर, रत्नकीळ, झुंजूरवेळ यांसारखी पुस्तकं वाचकप्रिय आहेत. वडील अनंत अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातल्या काही पत्रव्यवहारांवर आधारित ‘एक धारवाडी कहाणी’ हे पुस्तक त्यांनी संपादित केलं आणि त्याचंही चांगलं स्वागत झालं. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. 
 
(आनंद अंतरकर यांची सर्व पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या या लिंकवर वाचता येतील.) 

(आनंद अंतरकर यांच्या भगिनी अरुणा अंतरकर यांनी वडील अनंत अंतरकर यांच्या दिवाळी अंकासंदर्भातल्या सांगितलेल्या आठवणी जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRLBI
 अरुणा अंतरकर यांच्या आपल्या वडिलांविषयीच्या आठवणी, दिवाळी सणाविषयीच्या आठवणी अतिशय हृद्द आणि
अप्रतिम वाटल्या.
Similar Posts
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
जॉर्ज कॉफ्मन दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा लेखक-दिग्दर्शक असलेला आणि सहकाऱ्यांच्या साथीने लिहिलेल्या तब्बल ४५ नाटकांपैकी बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरण्याचे भाग्य लाभलेला अमेरिकेचा तुफान लोकप्रिय नाटककार जॉर्ज कॉफ्मनचा १६ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी
शिरीष पै, सुहास शिरवळकर केवळ तीन ओळींमध्ये आशय आणि भावना मांडण्याचा ‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठीत रुजवणाऱ्या शिरीष पै, ‘दुनियादारी’ या जबरदस्त कादंबरीने अवघ्या तरुणाईला भुरळ पाडणारे सुहास शिरवळकर आणि समाजभूषण चरित्रकार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय
रत्नाकर मतकरी खेकडा, कळकीचे बाळ यांसारख्या एकाहून एक उच्च दर्जाच्या गूढकथा लिहिणारे आणि लोककथा ७८, प्रेमकहाणी, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे यांसारखी सरस प्रयोगशील नाटकं लिहिणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language